नंदुरबार- शहादा तालुक्यातील नागझिरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या उमरापाणी, कंजापानी आणि कुंडीपाडा या गावांना जाण्यासाठी रस्ते नाहीत. गावकऱ्यांनी अनेक वेळा जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली. तरीदेखील प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. अखेर गावकऱ्यांनी बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील शहादा पोलीस स्टेशन समोर रास्ता रोको आंदोलन केले.
गावातील रस्त्यासाठी गावकरी एकवटले; शहादा पोलीस स्टेशन समोर रास्तारोको
नागझिरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या उमरापाणी, कंजापानी आणि कुंडीपाडा या गावांना जाण्यासाठी रस्ते नाहीत. गावकऱ्यांनी अनेक वेळा जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली. तरीदेखील प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. अखेर गावकऱ्यांनी बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील शहादा पोलीस स्टेशन समोर रास्ता रोको आंदोलन केले.
रास्तारोको
स्वातंत्र्यानंतरही या गावांत आजपर्यंत रस्त्यांचे जाळे निर्माण झाले नाहीत. रस्ते बनवण्यासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक असते. वनविभागाची परवानगी मिळण्यास उशीर होत असल्याने रस्ते तयार होत नसल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.