महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 26, 2020, 9:12 AM IST

ETV Bharat / state

ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोन भावांचा मृत्यू, निमगुळ-टाकरखेडा रस्त्यावरील घटना

निमगुळ ते टाकरखेडा रस्त्यावर भरधाव वेगातील वाळूच्या ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली आहे. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक चार वर्षीय मुलगा जखमी झाला आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

two-dead-and-one-injured-in-truck-bike-accident-in-nandurbar
ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोन भावांचा मृत्यू

नंदुरबार- निमगुळ ते टाकरखेडा रस्त्यावर भरधाव वेगातील वाळूच्या ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली आहे. या भीषण अपघातात दोघे भाऊ जागीच ठार झाले आहेत. तर त्यांचा पुतण्या जखमी झाला असून घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला आहे.

हेही वाचा-थेट सरपंच निवड पद्धत रद्द करणारे विधेयक मंजूर; विरोधकांच्या गदारोळातच शिक्कामोर्तब

शहाद्याकडून दोंडाईच्याकडे वाळूने भरलेल्या ट्रक (एमएच 18 बीजी 1495) जात होता. दरम्यान, या ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला (एमएच 39 एम 3098) जोराची धडक दिला. या भीषण अपघात राकेश पोपट बोरसे (वय 37), पुष्पराज प्रकाश बोरसे (वय 19) दाघे (रा.कळंबू ता.शहादा) भाऊ जागीच ठार झाले. तर त्यांच्या सोबत असलेला चार वर्षीय पुतण्या जखमी झाला आहे. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. टाकरखेडा ग्रामस्थांनी जखमीला दोंडाईच्या ग्रामीण रुग्णालयाय दाखल केले.

दरम्यान, राकेश बोरसे हा घराचा कर्ता पुरुष होता. त्याच्या पश्‍चात पत्नी, एक लहान मुलगी, मुलगा, आई व भाऊ असा परिवार आहे. तर पुष्पराज बोरसे हा एकुलता एक मुलगा होता. गेल्या वर्षी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर वडिलांना शेतीकामात तो मदत करीत होता. या दोघांच्याही अपघाती निधनामुळे कळंबू गावावर शोककळा पसरली आहे. वाळूच्या ट्रकने एकाच कुटुंबातील दोघांचा बळी घेतल्याने ट्रक चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कळंबू ग्रामस्थांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details