नंदुरबार - जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये चौकाचौकात कोरोना प्रतिबंधक लस अगदी सहज उपलब्ध आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेतील नर्मदा काठच्या दुर्गम व अतिदुर्गम आदिवासी गाव पाड्यांवर लसीकरणासाठी ( Vaccination in remote areas of Nandurbar ) काय मेहनत घ्यावी लागती. नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा किनाऱ्यांवर असणारे वाडे-पाडे गाठण्यासाठी जीप, बोट ॲम्बुलन्स (तरंगता दवाखाना) आणि त्यांनतरही पायपीट करुन लोकांच्या घरापर्यत जावुन अतिदुर्गम भागातील लसीकरणाचा खडतर प्रवास करणाऱ्या या साऱ्या यंत्रनेला प्रोत्साहनासाठी हा खास विशेष वृत्तांत....
लसीकरणासाठी विशेष प्रयत्न -
अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील बहुमतांशी भाग हा दुर्गम व अतिदुर्गम आहे. डोंगराळ भाग व नर्मदा नदीमुळे या भागात रस्ते व दळणवळणाची साधने नसल्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरण ( Vaccination in remote areas of Akkalkuwa ) करण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. परिणामी लसीकरणाचे प्रमाण कमी होते. मात्र या अडचणीवर मात करीत जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग बोट ॲम्बुलंसचा (तरंगते दवाखाने) वापर करून लसीकरण मोहीम राबवीत आहे. डोंगर-दऱ्यातील उपलब्ध रस्त्यांवर वाहनाद्वारे खडतर प्रवास करीत वैद्यकीय पथक नर्मदा नदीच्या काठा पर्यंत जात असून, पुढचा प्रवास बोट ॲम्बुलंसने करून नर्मदा नदी व त्याच्या बॅक वॉटर ने वेढलेल्या गाव- पाड्यांच्या घरा-घरा पर्यंत पोहोचत आहे. दुर्गम पाड्यांवर लसीकरण शिबिरांचे आयोजन करून लाभार्थींना बोट ॲम्बुलसने शिबिरापर्यंत आणले जात आहे. तर बहुतांशी घरा घरात जाऊन लसीकरण केले जात आहे. या बोट ॲम्बुलसमध्येही लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. काठावरील ग्रामस्थ या केंद्रातूनही लसीकरण करून घेत आहेत. या भागातील आशा वर्कर यासाठी विशेष प्रयत्न करीत असून छोट्या बोटीतून लाभार्थींना त्या बोट ॲम्बुलस व शिबिरापर्यंत आणून त्यांना लसीचे डोस देण्यात येत आहे.
असा होता दुर्गम भागातील लसीकरणाचा प्रवास -
नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यात अतिदुर्गम भागात वसलेले हे आहे जांगठी प्राथमिक आरोग्य केंद्र. प्राथमिक आरोग्य केंद्रातुन निघणार हा आरोग्य कर्मचारी यांची हि टिम जात आहे ती अतिदुर्गम भाग असणाऱ्या नर्मदा काठावरील वाड्या पाड्यांवर लसीकरणासाठी, सुरुवातीला डोंगरदऱ्यातून अतीशय चिंचोळ्या आणि जीवघेण्या घाट रस्तांमधुन अशा पद्धतीने गाडीतुन तब्बल दहा ते 12 किलो मीटरचा प्रवास करुन आरोग्य विभागाची टिम पोहचली आहे. नर्मदा किनारी वसलेल्या चिमलखेडी गावात, मग येथुन सुरू होतो तो तंरगता दवाखाना अर्थात बोट ॲम्ब्युलंन्सचा प्रवास. सर्व आरोग्याच पथक, तरंगत्या दवाख्यान्यातील तैणात आरोग्य पथक, आशा अंगणवाडी सेविका हे मग नर्मदा किनाऱ्यांवर वस्ती असलेल्या वाड्या पाड्यावर लसीकरणासाठी अनेक किलोमीटरचा बोटीने प्रवास करुन गाठता तो नर्मदा किनारा, मग किनाऱ्यापासून डोंगरावर दुरवर वसलेल्या गावांपर्यंत पायपीट करुन मग सुरु होते ती "हर घर दस्तक लसीकरण अभियान". या मोहीमेत काही पाड्यांवर एकाच ठिकाणी बसुन त्या ठिकाणच्या लाभार्थ्याना एकत्र आणुन लसीकरण केले जाते. तर कुठे घराघरापर्यत पोहचुन प्रत्येक लाभार्थ्यांला लस दिल्या जात आहे. दुसरीकडे आदिवासी बांधवामध्ये लसीकरणाबाबत असलेल्या गैरसमजातुन या लसीकरण पथकाला मोठा विरोधही सहन करावा लागत आहे. मात्र स्थानिकांच्या मदतीने हे काम शक्य होत असल्याच पथकातील वैद्यकीय अधिकारी सांगतात.
आशा वर्करांचे ध्येय 100% वाड्या पाड्यांमध्ये लसीकरण -