महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केंद्र सरकारच्या पाठबळामुळेच जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर भ्याड हल्ला - मेधा पाटकर

जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याचा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी निषेध व्यक्त केला. याप्रकरणी त्यांनी शहादा तहसीलदारांना निवेदन देवून सखोल चौकशीची मागणी केली आहे.

nandurbar
मेधा पाटकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या

By

Published : Jan 6, 2020, 12:59 PM IST

नंदुरबार -दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी शहादा तहसीलदारांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला.

मेधा पाटकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या

दिल्लीतील जेएनयूमध्ये विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षावरील हल्ला केंद्र सरकारच्या पाठबळामुळे झालेला भ्याड हल्ला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कार्यकर्ता कोमल शर्मा ही त्या हल्लाखोर मास्क घातलेल्यांसोबत दिसत आहे. त्याठिकाणी उपस्थित असलेले पोलीस बघ्याची भूमिका घेत होते. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, असेही त्या म्हणाल्या.

मी अनेकवेळा जेएनयुमध्ये गेली आहे. त्या ठिकाणी राष्ट्रवादावर चर्चा होत असते. तेथील विद्यार्थी प्रखर राष्ट्रवादी असून त्यांना देशद्रोही आणि नक्षल-दहशतवादी ठरवणे चुकीचे आहे. नर्मदा बचाव आंदोलन आणि सर्वच सामाजिक संघटना याचा निषेध करत आहेत.

हेही वाचा - 'फडणवीस सरकारने राज्याच्या डोक्यावर ७ लाख कोटींचे कर्ज ठेवले'

देशात असे होणारे हल्ले लोकशाहीला घातक असल्याचे सांगत त्यांनी केंद्र सरकारवर गंभीर टीका केली. सोबतच या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मेधा पाटकर यांनी तहसीलदार यांना निवेदनही दिले आहे.

हेही वाचा - महाराष्ट्र पोलीस वर्धापन सप्ताह : नंदुरबारमध्ये विद्यार्थ्यांसाठी शस्त्र प्रदर्शन

ABOUT THE AUTHOR

...view details