महाराष्ट्र

maharashtra

शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज; शिक्षकांना कोरोना चाचणी सक्तीची

जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील विविध शासकीय केंद्रांवर तपासणीसाठी शिक्षकांची गर्दी होत आहे. शिक्षकांची कोरोना चाचणी अनिवार्य केल्यानंतर अनेकांनी रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट करण्याचे सूचविले होते. मात्र, आरटीपीसीआर चाचणीचीच सक्ती करण्यात आली आहे.

By

Published : Nov 22, 2020, 5:24 PM IST

Published : Nov 22, 2020, 5:24 PM IST

Updated : Nov 22, 2020, 9:31 PM IST

nandurbar school opening
नंदुरबार शाळा सुरू होणार

नंदुरबार -उद्या सोमवारी 23 नोव्हेंबरपासून इयत्ता 9वी ते 12वीचे वर्ग सुरू होणार असल्याने शिक्षकांना कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून शाळा बंद होत्या. मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर प्रथमच 23 नोव्हेंबरपासून 9वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. यापार्श्‍वभूमीवर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना दि. 22 नोव्हेंबरपर्यंत कोरोना चाचणी अनिवार्य केली आहे.

शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम याबाबत माहिती देताना.

जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील विविध शासकीय केंद्रांवर तपासणीसाठी शिक्षकांची गर्दी होत आहे. शिक्षकांची कोरोना चाचणी अनिवार्य केल्यानंतर अनेकांनी रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट करण्याचे सूचविले होते. मात्र, आरटीपीसीआर चाचणीचीच सक्ती करण्यात आली आहे. या निर्णयाचे अनेकांकडून स्वागत करण्यात येत आहे तर अनेकांनी याबाबत धास्तीदेखील घेतली आहे. शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभाग सज्ज झाले असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यात तळोदा व नंदुरबार प्रकल्पांतर्गत येणार्‍या 74 आश्रमशाळा वगळता 343 माध्यमिक शाळा व 78 कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे 2 हजारपेक्षा अधिक शिक्षकांची कोरोना चाचणीला करण्यात आली आहे. यामुळे कोरोना तपासणी केंद्रांवर शिक्षकांची गर्दी केली आहे.

जिल्ह्यातील शाळांची संख्या व कार्यरत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी

नंदुरबार जिल्ह्यात 172 अनुदानित माध्यमिक शाळा, 6 विनाअनुदानित शाळा, 87 अंशतः अनुदानित शाळा तसेच सीबीएसई, इंग्रजी माध्यम किंवा स्वयंअर्थसहाय्यीत अशा 73 शाळा, समाजकल्याण अंतर्गत दोन शाळा तर 78 कनिष्ठ महाविद्यालये आहेत. यामध्ये 1 लाख 98 हजार 768 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एकूण 5 हजार 845 शिक्षक व 1 हजार 158 शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. यातील 9 वी ते 12 वी च्या शिक्षकांमध्ये 50 टक्के इतके 1 हजार 731 शिक्षक, इंग्रजी माध्यमाचे 275 शिक्षक असे एकूण 2 हजार 6 शिक्षकांची चाचणी करण्यात येणार आहे.

हेही वाचा -'विधानपरिषदेत शिक्षक हवेत, दलाल नको'; फडणवीसांची टीका

जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या -

नंदुरबार जिल्ह्यात एकूण 417 माध्यमिक शाळा असून 1 लाख 98 हजार 768 विद्यार्थी तर 5 हजार 845 शिक्षक आहेत. यात नंदुरबार तालुक्यात 112 माध्यमिक शाळा असून 1 हजार 662 शिक्षक आहेत. नवापूर तालुक्यात 80 शाळांमध्ये 1 हजार 21 शिक्षक अध्यापनाचे काम करीत आहेत. शहादा तालुक्यातील 95 शाळांमध्ये 1 हजार 579 शिक्षक कार्यरत आहेत. तळोदा तालुक्यात 41 शाळांमध्ये 523, अक्कलकुवा तालुक्यातील 56 शाळांमधील 692 तर धडगाव तालुक्यातील 33 शाळांमध्ये 368 शिक्षक आहेत. असे असले तरी 23 नोव्हेंबरपासून केवळ 9 वी ते 12 वीच्या वर्गांना सुरुवात होणार असल्याने या वर्गांना अध्यापन करणार्‍या शिक्षकांचीच कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आलेली नाही. आठ महिन्यानंतर प्रथमच शाळेची घंटा वाजणार असल्याने पालकांनी विद्यार्थ्यांबाबत खबरदारी घेऊन शाळेत पाठविणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील 20 शिक्षक बाधित -

जिल्ह्यात एकूण 20 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. अजून किती शिक्षक बाधित होतात? याकडे विभागाचे लक्ष लागून आहेत.

खबरदारी घेऊन शाळा सुरू - शिक्षणाधिकारी

शाळा सुरू होत असताना पालकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणे आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गुणवत्ता वाढीसाठी व गुणवत्ता टिकविण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेत येणे गरजेचे आहे, असे शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम म्हणाले आहेत.

Last Updated : Nov 22, 2020, 9:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details