नंदुरबार- शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील 17 ठिकाणे सील करण्यात आली असून 14 ठिकाणी बॅरिकेटस लावण्यात आले आहेत. यामुळे तीन दिवसांत शहरातून कुठलेही वाहन येणार नाही किंवा बाहेर जाणार नाही. याची खबरदारी प्रशासनाच्या वतीने घेण्यात येत आहे. शहरातील सर्वच रस्ते सील करण्यात आले आहेत.
कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने नंदुरबार शहरातील सर्वच रस्ते सील
शहरातील विविध भाग सील करण्यात आले असून सुरक्षिततेच्या दृष्टीने काही रस्त्यांना बॅरिकेटस लावण्यात आले आहेत. नागरिकांनी बॅरिकेटस लावलेल्या परिसरात जावू नये, असे आवाहन नगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
नंदुरबार शहरात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनासह नगरपालिका आरोग्य विभाग देखील सतर्क झाला आहे. शहरातील विविध भाग सील करण्यात आले असून सुरक्षिततेच्या दृष्टीने काही रस्त्यांना बॅरिकेटस लावण्यात आले आहेत. जेणेकरून शहरात कुठलेही वाहन येणार नाही किंवा बाहेर जाणार नाही. याची प्रभावीपणे अंमलबाजवणी करणयात येणार आहे.
शहरातील अली सहाब मोहल्ला, फकीर मोहल्ला, बालाजी वाडा, दखनी गल्ली, मणियार मोहल्ला, बिस्मिल्ला चौक, बिफ मार्केट रोड, माळीवाडा, रज्जाक पार्क, अमीन भैय्या चाळ, चीचपडा भिलाटी, मेहतर वस्ती, गोंधळी गल्ली, जुना बैल बाजार या सर्व ठिकाणी तीनवेळा सोडियम हायपोक्लोराईड सोल्युशनची जंतुनाशक फवारणी करण्यात आली. नागरिकांनी सील केलेल्या भागात किंवा बॅरिकेटस लावलेल्या परिसरात जाऊ नये, असे आवाहन नगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.