नंदुरबार- जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून भात लागवडीच्या कामाला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला पावसाचा मोठा खंड पडल्याने भात रोपण शेती यंदा होईल की नाही याबद्दल शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात होती.
नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; शेतकऱ्यांकडून भात लागवडीला सुरुवात शेतीला मोठ्या पावसाची गरज असते, भात रोपण करण्यासाठी शेतात पाणी भरून नांगरणी करून चिखल केल्यानंतर भात लागवड करण्याची पद्धत आहे. त्यासाठी जास्त पाण्याची गरज असते. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर कायम असल्याने शेतकऱ्यांकडून भात लागवडीच्या कामांना वेग आला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा जोर कायम भात रोपण शेतीचे वैशिष्ट्ये -
- सुरुवातीला एका विशिष्ट जागेवर शेणखत आणि पालापाचोळा जाळून त्या जागेवर भाताच्या बियाण्याची पेरणी केली जाते.
- पेरणी केलेली रोपे पंधरा ते वीस दिवसांच्या कालावधीत एक फूटपर्यंत वाढ झाल्यानंतर शेतात ज्या ठिकाणी भात लागवड करायची असेल त्या जागेला चारीबाजूंनी बांध तयार करून त्यात पाणी जमा करून नांगरणी करून चिखल तयार केला जातो.
- तयार झालेली भाताची रोपं उपटून परत चिखलात रोपण केली जातात
- भात रोपण केलेल्या जागेत पीक येईपर्यंत पाच सेंटीमीटरपर्यंत कायम पाणी द्यावे लागते
शेतकऱ्यांकडून भात लागवडीला सुरुवात
भात रोपण केलेल्या शेतीला पाण्याची कायम गरज असते. त्यामुळे पुढचे दोन महिने पाऊस समाधानकारक असावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ndb-01-bhat-lagvad-edited-pkg_31072019144054_3107f_1564564254_389.jpg