नंदुरबार - राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांचा शहादा हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेल्यापासून ते मुंबईत तळ ठोकून होते. बुधवारी मुंबईहून परत आल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसोबत बोलून पुढची दिशा ठरवणार असल्याचे सांगितले आहे, यामुळे राजेंद्र गावित हे अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
शहादा मतदारसंघातून राजेंद्रकुमार गावित अपक्ष लढण्याच्या तयारीत हेही वाचा... दुसऱ्या यादीतही एकनाथ खडसेंना ठेंगा; पत्ता कापल्याचे निश्चित?
शहादा विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापण्यास सुरुवात झाली आहे. राजेंद्र गावित यांच्या निवासस्थानी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची गर्दी होत होती. यावेळी बोलताना गावित यांनी, कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे सांगितले आहे.
हेही वाचा...'भाजप गुंडांना तिकीट देते, त्यामुळे दाऊदच्या टोळीतील लोकदेखील खासदार झालेत..'
राजेंद्र गावित हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे. राजेंद्र गावित यांचा शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठा जनसंपर्क आहे. यामुळे गावित हे आता राष्ट्रवादीशी बंडोखोरी करत अपक्ष निवडणूक लढवणार की, मनसेची उमेदवारी स्वीकारतात हे काही दिवसात स्पष्ट होणार आहे.