नंदुरबार- जिल्ह्यातील खेडदिगर बस स्थानकावर गावठी पिस्तूल विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना याप्रकरणी माहिती मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी वेशांतर करून खेडदिगर गावाच्या बसस्थानकाजवळ सापळा रचला व आरोपीला अटक केली.
मुख्तार शेख मुसीर शेख असे आरोपीचे नाव आहे. मध्यप्रदेशातील खेतियाकडून खेडदिगर बस स्थानकावर एक व्यक्ती गावठी पिस्तूल विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी माहितीच्या आधारे वेशांतर करून खेडदिगर गावाच्या बसस्थानकाजवळ सापळा रचला व आरोपील अटक केली. दिवसभर बसस्थानक परिसरात संशयित व्यक्तीचा शोध घेऊनही तो सापडला नाही.
दरम्यान, रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास खेडदिगर गावातील बसस्थानकासमोरील एका दुकानाजवळ अज्ञात व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना दिसून आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्यास नाव-गाव विचारले असता त्याने आपले नाव मुख्तार शेख मुशीर शेख (रा.शिरसाळे बु.ता.अमळनेर) असे सांगितले. पथकाने त्याच्या अंगाची झडती घेतली असता कमरेला २५ हजार रुपये किंमतीची विना परवाना गावठी बनावटीची पिस्तूल व खिशात हजार रुपये आढळले. त्याचबरोबर, पोलिसांना दोन जिवंत पितळी काडतूस देखील आढळले.