पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन
जिल्ह्यातील प्रस्तावीत मॉडेल डिग्री कॉलेजची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील क्रांतिवीर बिरसा मुंडा सभागृहात विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी व मान्यवरांच्या उपस्थीतीत हा कार्यक्रम पार पडला.
sf
नंदुरबार - जिल्ह्यातील प्रस्तावीत मॉडेल डिग्री कॉलेजची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील क्रांतिवीर बिरसा मुंडा सभागृहात विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी व मान्यवरांच्या उपस्थीतीत हा कार्यक्रम पार पडला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीर येथून उपस्थितांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधीत केले. या कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. हिना गावीत, जिल्हाधिकारी एम. कलशेट्टी, आमदार सुरुपसिंग नाईक आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. नंदुरबार जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. या कॉलेजच्या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेता येणार आहे. या महाविद्यालयाच्या उभारणीसाठी शासनाद्वारे जवळपास १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या वास्तूची उभारणी जलद गतीने व्हावी अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.