नंदुरबार - कृषी उत्पन्न बाजार समितीतील भुसार मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर गहू, मका, ज्वारी आणि दादरची आवक आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. त्यामुळे अखेर बाजार समितीने खरेदी-विक्री सुरू केली आहे. एक दिवस अगोदर तालुका कृषी कार्यालयात जाऊन शेतकऱ्याला आपल्या मालाचे वजन करून आपले नाव नोंदवावे लागणार आहे. त्यानुसार बाजार समितीत त्या शेतकऱ्यांना बोलावून त्यांच्या मालाची खरेदी-विक्री केली जाईल.
योग्य ती खबरदारी घेऊन अखेर नंदुरबार भुसार मार्केट सुरू
नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गहू, मका, ज्वारी आणि दादरची देखील लागवड केली जाते. मार्केट बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. माल तयार असूनही तो विक्रीसाठी कुठे घेऊन जायचा, असा प्रश्न बळीराजा समोर आहे. म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीने निर्णय घेत भुसार मार्केट सुरू केले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील भुसार मार्केटमध्ये दोन राज्यातून व्यापारी आणि शेतकरी येत असतात. सध्या गहू, मका, ज्वारी आणि दादरच्या हंगाम आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गव्हाची लागवड केली जाते. तसेच मका, ज्वारी आणि दादरची देखील लागवड केली जाते. मार्केट बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. माल तयार असूनही तो विक्रीसाठी कुठे घेऊन जायचा, असा प्रश्न बळीराजा समोर आहे. म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीने निर्णय घेत भुसार मार्केट सुरू केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी म्हणून तालुका कृषी कार्यालयात शेतकऱ्यांनी आपले नाव नोंदवावे. त्यानंतर बाजार समिती त्या शेतकऱ्याला माल विक्रीसाठी कधी आणायचा हे दूरध्वनीद्वारे कळवेल. यामुळे मार्केट यार्डात शेतकरी आणि व्यापाऱ्यांची गर्दी होणार नाही. शेतकऱ्याचे धान्य कृषी उत्पन्न बाजार समितीत आल्यानंतर आणलेल्या वाहनातच त्याचा लिलाव केला जाईल आणि मोठ्या वजनकाट्यावर वाहनासहित मालाचे वजन केले जाईल. मार्केट दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू राहील आणि सर्व शेतकऱ्यांच्या मालाची विक्री केला जाईल, असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी सांगितले.