नंदुरबार:धुळे-सुरत महामार्गावर रंगावली पुलावर आज सकाळी ट्रक आणि टँकरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दूध टँकर उलटला असून चालक गंभीर जखमी झाला. टँकरमधील 25 हजार लिटर दूध रंगावली नदीत वाहून गेले. दूध रस्त्यावर वाहून जात असल्याने आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी दूध घेण्यासाठी महामार्गावर धाव घेतली.
नवापुरातील रंगावली पुलावर दुधाचा टँकर पलटी; चालक जखमी
नवापूर शहरातील रंगावली पुलावर मोठे-मोठे खड्डे पडेल आहेत. खड्डे चुकवण्याचा नादात सुरतकडून धुळ्याकडे जाणाऱ्या एका ट्रकने अचानक विरुद्ध बाजूला वळण घेतल्याने समोरून येणाऱ्या दुध टँकरला जोरदार धडक दिली. या अपघातात टँकर नदीत कोसळला व चालक गंभीर जखमी झाला.
नवापूर शहरातील रंगावली पुलावर मोठे-मोठे खड्डे पडेल आहेत. खड्डे चुकवण्याचा नादात सुरतकडून धुळ्याकडे जाणाऱ्या एका ट्रकने अचानक विरुद्ध बाजूला वळण घेतल्याने समोरून येणाऱ्या दुध टँकरला जोरदार धडक दिली. या अपघातात टँकर नदीत कोसळला व चालक गंभीर जखमी झाला. परिसरातील नागरिकांनी जखमी चालकाला 108 रूग्णवाहिकेच्या मदतीने नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
आजूबाजूच्या नागरिकांनी याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. नवापूर पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. धुळे-सुरत महामार्गावरील मोठे खड्डे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी आमदार शिरिषकुमार नाईक यांनी केली आहे.