महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबार येथे पोलीस उपनिरीक्षकाची पत्रकारांना धक्काबुक्की

वृत्त संकलनासाठी गेलेल्या पत्रकारांना पोलीस उपनिरीक्षकाने अरेरावी करीत धक्काबुक्की केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करीत असल्याचे सांगून गुन्हा नोंदवण्याचीही धमकी त्याने दिली. त्याच्यानिषेधार्थ नंदुरबारमधील पत्रकारांनी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देत निषेध नोंदविला.

जिल्हा पोलीस अधिक्षकांना पत्रकारांनी निवेदन दिले

By

Published : Jun 9, 2019, 10:52 AM IST

नंदुरबार- जळगाव घरकुल घोटाळ्याच्या निकालाबाबतचे वृत्त संकलनासाठी गेलेल्या पत्रकारांना पोलीस उपनिरीक्षकाने अरेरावी करीत धक्काबुक्की केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करीत असल्याचे सांगून गुन्हा नोंदवण्याचीही धमकी त्याने दिली.

पोलीस उपनिरीक्षकाच्या निषेधार्थ पत्रकारांनी निषेध व्यक्त केला
धुळे येथील न्यायालयात जळगाव घरकुल घोटाळ्याच्या निकालाबाबतची शनिवारी सुनावणी सुरू होती. यावेळी तेथे वृत्त संकलनासाठी पत्रकारांचीही उपस्थिती होती. एका खासगी वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी, वृत्तपत्राचे प्रतिनिधी गणेश सूर्यवंशी, विजय शिंदे यांच्यासह इतर पत्रकारांना धुळे येथील पोलीस उपनिरीक्षक मनोज खडसे यांनी अरेरावी करीत धक्काबुक्की केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करीत असल्याचे सांगून गुन्हा नोंदविण्याचीही धमकी दिली.संबंधित पोलीस अधिकाऱ्याने पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली. त्यामुळे त्याच्यानिषेधार्थ नंदुरबारमधील पत्रकारांनी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील आणि अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देत निषेध नोंदविला. तसेच नंदुरबार जिल्ह्यात, अशा घटना घडू नये, अशी मागणी केली आहे. पत्रकारांवर झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी पत्रकारांनी काळ्या फिती लावून घोषणाही दिल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details