महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 15, 2020, 1:02 PM IST

ETV Bharat / state

अवैध स्पिरीटसह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघांना अटक

म्हसावद-धडगाव रस्त्यावर असलेल्या दरा चिचलाबारी गावाचे वळन रस्त्यावर मालवाहतूक गाडीतून 3 लाख रूपये किंमतीच्या निळ्या रंगाच्या प्रत्येकी 250 लिटरच्या 6 फायबर प्लॉस्टीकच्या टाक्या हस्तगत केल्या. त्यात बनावट दारू बनविण्याकामी उपयोगी पडणारे सुमारे 1500 लिटर स्पिरीट जप्त करण्यात आले आहे.

अवैध स्पिरीटसह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त
अवैध स्पिरीटसह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार - शहादा तालुक्यातील दरा फाट्याजवळ नंदुरबार गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने बेकायदेशीररित्या स्पिरीटची वाहतूक करणार्‍या दोन वाहनांना पकडून सुमारे 13 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून एक जण फरार झाला आहे.

नंदुरबार गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शिरपूरहून धडगावकडे अवैधरित्या स्पिरीटची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी पथकासह तालुक्यातील दरा फाट्याजवळ नाकाबंदी केली. दरम्यान, म्हसावद-धडगाव रस्त्यावर असलेल्या दरा चिचलाबारी गावाचे वळन रस्त्यावर मालवाहतूक गाडीतून 3 लाख रूपये किंमतीच्या निळ्या रंगाच्या प्रत्येकी 250 लिटरच्या 6 फायबर प्लॉस्टीकच्या टाक्या हस्तगत केल्या. त्यात बनावट दारू बनविण्याकामी उपयोगी पडणारे सुमारे 1500 लिटर स्पिरीट जप्त करण्यात आले आहे. सोबतच 5 लाख रूपये किंमतीची महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप (क्र एम एच 06 बी जी 3976) आदिंसह सुमारे 13 लाख 50 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल आणि तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर एक जण फरार झाला आहे. सदर गुन्ह्यांचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक किरण पवार करीत आहेत. सदर कारवाई पोहेकॉ असई भगवान धात्रक, दिपक गोरे, विकास अजगे, विजय ढिवरे, प्रमोद सोनवणे आदींनी केली.

हेही वाचा -प्रेमविवाह न करण्याच्या 'त्या' शपथेवर पंकजा मुंडेंना संताप; म्हणाल्या...

ABOUT THE AUTHOR

...view details