महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लाॅकडाऊन: दिव्यांग करतोय एका पायाने 400 किमीचा प्रवास...

गुजरात राज्यात हजारोंच्या संख्येने खान्देशातील मजूर जातात. देशात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला. त्या पाश्वभूमीवर सरकारने लाॅकडाऊन लागू केला. त्यामुळे हे मजूर तिथेच अडकून पडले. काम बंद झाल्याने मजुरांचा पोटापाण्याचा प्रश्न गंभीर बनला. खाण्यापिण्याचे वांदे झाल्याने कुठलाही आधार नसल्याने मजुरांनी गावाकडची वाट धरली.

दिव्यांग करतोय एका पायाने 400 किमीचा प्रवास...
handicap-traveling-400-km-on-one-foot

By

Published : May 4, 2020, 10:39 AM IST

नंदुरबार- एका दिव्यांगाने एका पायाने सायकल चालवत सूरत ते नवापूर असे 110 किलोमीटरचे अंतर पार केले आहे. अजून पुढील 300 किलोमीटरचे अंतर पार करुन त्याला जळगाव जिल्ह्यातील नागलवाडी येथे पोहोचायचे आहे.

दिव्यांग करतोय एका पायाने 400 किमीचा प्रवास...

हेही वाचा-राज्यातील कंटेनमेंट झोन वगळून इतर भागातील एकल दुकाने सुरू होणार

गुजरात राज्यात हजारोंच्या संख्येने खान्देशातील मजूर जातात. देशात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला. त्या पाश्वभूमीवर सरकारने लाॅकडाऊन लागू केला. त्यामुळे हे मजूर तिथेच अडकून पडले. काम बंद झाल्याने मजुरांचा पोटापाण्याचा प्रश्न गंभीर बनला. खाण्यापिण्याचे वांदे झाल्याने कुठलाही आधार नसल्याने मजुरांनी गावाकडची वाट धरली. पायपीट करीत, सायकलवर हे मजूर गावाच्या दिशेने पुढे जात आहेत.

सागर नावाचा हा दिव्यांगही परिवारासोबत सायकल घेऊन पायीच घरी निघाला आहे. दोन दिवसात 110 किलोमीटरचा रस्ता त्याने पार केला असून पुढे त्याला अजून 300 किलोमीटरचा पल्ला पार करायचा आहे. साधारन तीन तीवसाचा त्याचा प्रवास होणार असल्याचे तो सांगतो.

ABOUT THE AUTHOR

...view details