महाराष्ट्र

maharashtra

नंदुरबार: ग्रामपंचायतींच्या 54 रिक्त जागांसाठी फक्त 21 अर्ज दाखल

नंदुरबार जिल्ह्यात एकूण 43 ग्रामपंचायतींमध्ये 54 जागा रिक्त झाल्याने पोटनिवडणूक घेणे आवश्यक आहे. पोटनिवडणुकीचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. फक्त 21 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने एकंदरीत जिल्ह्यात निवडणूक व मतदाना विषयी लोकांमध्ये उत्सुकता कमी झाली आहे, असे चित्र दिसत आहे.

By

Published : Nov 22, 2019, 4:58 PM IST

Published : Nov 22, 2019, 4:58 PM IST

54 रिक्त पदांसाठी 21 अर्ज

नंदुरबार - जिल्ह्यातील 43 ग्रामपंचायतींच्या 54 रिक्त पदांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवस अखेर फक्त 21 अर्ज दाखल झाले. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेकडे अनेकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे.

ग्रामपंचायतींच्या 54 रिक्त जागांसाठी फक्त 21 अर्ज दाखल


उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची संख्या कमी असल्याने निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेले कक्ष रिकामे पडले आहेत. जिल्ह्यात एकूण 43 ग्रामपंचायतींमध्ये 54 जागा रिक्त झाल्याने पोटनिवडणूक घेणे आवश्यक आहे. पोटनिवडणूकीचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. फक्त 21 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने एकंदरीत जिल्ह्यात निवडणूक व मतदाना विषयी लोकांमध्ये उत्सुकता कमी झाली आहे, असे चित्र दिसत आहे.

हेही वाचा - दोन दिवसात अंतिम निर्णय समजेल, उद्धव ठाकरे घेणार अंतिम निर्णय

शहादा तालुक्‍यातील 20 ग्रामपंचायतीतील 27, नंदुरबार तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीतील 13, नवापुर तालुक्यातील 1, अक्कलकुवा तालुक्यात 6, तळोदा तालुक्यात 3 ग्रामपंचायतीतील 6 रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. 21 तारीख ही उमेदवारी दाखल करण्याची शेवटची मुदत होती. मुदती नंतर शहाद्यातील 27 जागांसाठी केवळ 1, नंदुरबार येथे 23 जागांसाठी 5, नवापूर येथे 1, तळोदा आणि धडगावसाठी प्रत्येकी एक-एक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. या अर्जांची पडताळणी शुक्रवारी करण्यात येणार आहे. मात्र, 54 जागांसाठी 21 अर्ज दाखल झाल्याने 33 जागा पुन्हा रिक्त राहणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details