नंदुरबार -नुकताच राज्य विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत निवडणूक लढवणार्या पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा होती. शहादा विधानसभा मतदारसंघातून राजेश पाडवी आणि नालासोपारा मतदारसंघातून प्रदिप शर्मा हे दोन पोलिस अधिकारी निवडणुकीच्या रिंगणात होते. शहाद्यातून राजेश पाडवी विधानसभेवर निवडून गेले आहेत. पाडवींनी कॉंग्रेसच्या पद्माकर वळवींचा पराभव केला.
पोलीस निरीक्षक कार्यालयातून थेट विधानसभेत!
मुंबई येथे कार्यान्वित असलेल्या राजेश पाडवी यांनी पोलीस निरीक्षक पदाचा राजीनामा देवून भाजपकडून निवडणूक लढवली. शहादा मतदारसंघातून राजेश पाडवी विजयी झाले आहेत.
राजेश पाडवी,आमदार शहादा विधानसभा मतदारसंघ
हेही वाचा - नंदुरबारमध्ये काँग्रेसचे नगरसेवक निलंबित, पक्षविरोधी कारवाईचा ठपका
मुंबई येथे कार्यान्वित असलेल्या राजेश पाडवी यांनी पोलीस निरीक्षक पदाचा राजीनामा देवून भाजपकडून निवडणूक लढवली. आपल्याला वीस वर्षांचा प्रशासकीय सेवेचा अनुभव आहे. राजकारणात मला माझ्या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल. मी माझ्या मतदारसंघातील समस्या सोडवण्याचा पुरेपुर प्रयत्न करेल, असे राजेश पाडवी यांनी सांगितले.
TAGGED:
शहादा विधानसभा मतदारसंघ