नंदुरबार -चांगल्या पावसाची वाट बघत शेतकऱ्यांनी बाजारात उपलब्ध असलेल्या बियाणांची खरेदी सुरू केली आहे. बियाणे विक्रेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत 40 टक्के बियाणांची विक्री झालेली आहे. यामध्ये कापूस, मक्का, उडीद, मुग, ज्वारी, सोयाबीन, तुर, भात इत्यादी बियाणांचा समावेश आहे.
खरीप हंगामासाठी ४० टक्के बियाणांची झाली खरेदी; बळीराजाला प्रतीक्षा दमदार पावसाची
पावसाची वाट बघत शेतकऱ्यांनी बाजारात उपलब्ध बियाणांची खरेदी सुरू केली. यात आतापर्यंत 40 टक्के बियाणांची विक्री झाल्याची माहिती बियाणे विक्रेत्यांनी दिली.
खरेदीसाठी ठेवलेली बियाणे
सुरवातीचा पाऊस न झाल्याने कापूस लागवड या वर्षी कमी होईल असा अंदाज व्यक्त होत आहे. जर जुलै महिन्यात पावसाला चांगली सुरुवात झाली तर कमी दिवसात येणाऱ्या पिकांची निवड शेतकऱ्यांकडून होऊ शकते. बियाणांची खरेदी देखील त्याप्रमाणेच केली जाईल.