महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महामार्गासाठी जमीन संपादित केल्यानंतर मोबदला मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक; आंदोलानाचा इशारा

राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा अद्याप मोबदला आणि नुकसानाची भरपाई मिळत नसल्याने शहादा तालुक्यातील करजाई आणि डामरखेडा येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. १५ ऑगस्ट रोजी रस्ता रोको आणि आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

farmers in nandurbar
महामार्गासाठी जमीन संपादित केल्यानंतर मोबदला मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक; आंदोलानाचा इशारा

By

Published : Aug 12, 2020, 12:34 PM IST

नंदुरबार - अंकलेश्वर बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५ च्या चौपदरी करणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू असून यासाठी एमआरडीसीने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. त्याचप्रमाणे रस्त्याचे काम सुरू असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. संपादित केलेल्या जमिनीचा अद्याप मोबदला आणि नुकसानाची भरपाई मिळत नसल्याने शहादा तालुक्यातील करजाई आणि डामरखेडा येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. १५ ऑगस्ट रोजी रस्ता रोको आणि आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत तहसीलदारांना शेतकर्‍यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

मागील दोन वर्षांपासून शेतकरी आपल्या संपादित झालेल्या जमिनीच्या रकमेसाठी फेऱ्या मारत आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाला असून त्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्ह्यातील अंकलेश्वर बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरी करण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. यात शहादा तालुक्यातील करजाई आणि डामरखेडा परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. त्या रस्त्याचे काम सुरूच आहे.

१५ ऑगस्ट रोजी रस्ता रोको आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा शेतऱ्यांनी दिला आहे. याबाबत शहादा तहसीलदारांना निवेदन देऊन त्यांनी आपली व्यथा मांडली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details