नंदुरबार - जिल्ह्यात जवळपास 3 हजार 700 शेतकऱ्यांनी कापूसविक्रीसाठी नोंदणी केली होती. मात्र, या शेतकऱ्यांचे कापूस अजूनही विक्री न झाल्याने आणि खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत घरात ठेवलेला कापूस खराब होण्याची भीती आता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे
नंदुरबारमध्ये कापूसविक्री अजूनही बाकी, शेतकरी संकटात
उत्तर महाराष्ट्रात सर्वात जास्त कापसाचे क्षेत्र नंदुरबार जिल्ह्यात आहे. कापूस विक्रीच्या हंगामात लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचा कापूस घरात पडून आहे. कापूसविक्रीसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे नोंदणी केल्यानंतर बाजार समितीमार्फत दररोज 50 शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी केली जाते.
उत्तर महाराष्ट्रात सर्वात जास्त कापसाचे क्षेत्र नंदुरबार जिल्ह्यात आहे. कापूसविक्रीच्या हंगामात लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचा कापूस घरात पडून आहे. कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे नोंदणी केल्यानंतर बाजार समितीमार्फत दररोज 50 शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी केली जाते. तरीही अजून 2 हजार 300 शेतकऱ्यांचा कापूसविक्री होणे बाकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या उभी ठाकली आहे.
सध्या तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या यादीनुसार 50 शेतकऱ्यांना बोलावून त्यांच्या मालाची योग्य ती किंमत ठरवली जाते. आतापर्यंत जवळपास साडेबाराशे शेतकऱ्यांचा 40 क्विंटल कापूस विक्री झाला असून जवळपास 2 हजार 300 शेतकऱ्यांची कापूसखरेदी बाकी आहे. शासनाच्या हमी भावानुसार 5100 ते 5400 कापूस ग्रीननुसार खरेदी केला जाते, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन किशोर पाटील व सचिव योगेश अमृतकर यांनी दिली.