महाराष्ट्र

maharashtra

केळीचे भाव निम्म्यावर; उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतले जाते. मात्र, लॉकडाऊनमुळे यंदा राज्यातील व्यापारी वर्गाने देखील केळीकडे पाठ फरवली आहे. परिणामी काढलेला माल मोठ्या प्रमाणावर स्थानिक बाजारपेठेत विकावा लागत आहे. स्थानिक बाजारपेठेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर केळीची खरेदी होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना पाहिजे तेवढे उत्पन्न निघत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

By

Published : Jul 26, 2020, 11:19 AM IST

Published : Jul 26, 2020, 11:19 AM IST

bananas has gone down
केळीचे भाव निम्म्यावर

नंदुरबार- जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी निर्यातक्षम केळी उत्पादन घेऊन मोठ्या प्रमाणात विदेशात केळी निर्यात करत असतात. त्या केळीला १२ ते १५ रुपये प्रती किलो प्रमाणे दर मिळत होता. मात्र लॉकडाऊनच्या काळात हा दर अवघा प्रतिकिलो ४ ते ५ रुपये इतकाच मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते. त्यापैकी अनेक शेतकरी केळी निर्यात करत असतात. मात्र कोरोनामुळे निर्यात थांबली आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे देशभरात केळीची मागणी घटली आहे. मात्र, शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या केळीच्या बागा आता तोडणीला आल्या आहेत. त्यामुळे फळ झाडावर जास्त दिवस न ठेवता शेतकऱ्यांना केळीची तोडणी करावीच लागणार आहे. परिमाणी बाजारात केळीची आवक वाढली आहे. मात्र याच संधीचा फायदा घेऊन व्यापारी शेतकऱ्यांची लुबाडणूक करत आहेत. शेतकऱ्यांच्या केळीला कवडीमोल भाव दिला जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. सध्याच्या घडीला मिळणाऱ्या भावातून शेतकऱ्यांचा आर्थिक खर्च निघत नाही, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडाला आहे.

केळीचे भाव निम्म्यावर

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतले जाते, मात्र लॉकडाऊनमुळे यंदा राज्यातील व्यापारी वर्गाने देखील केळीकडे पाठ फरवली आहे. परिणामी काढलेला माल मोठ्या प्रमाणावर स्थानिक बाजारपेठेत विकावा लागत आहे. स्थानिक बाजारपेठेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर केळीची खरेदी होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना पाहिजे तेवढे उत्पन्न निघत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.



ABOUT THE AUTHOR

...view details