नंदुरबार -जिल्ह्यातील नवापूर नगर पालिकेतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 3 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. या नगरसेवकांनी बंडखोरी करत नवापूर विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या उमदेवाराचा प्रचार न करता भाजप उमेदवाराचा प्रचार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. गटनेते तथा नगरसेवक गिरिश पद्माकर गावित, स्वीकृत नगरसेवक बंटी चंदलानी, नगरसेविका मंगला विजय सैन असे हकालपट्टी केलेल्या नगरसेवकांचे नाव आहे.
नंदुरबारमध्ये काँग्रेसचे नगरसेवक निलंबित, पक्षविरोधी कारवाईचा ठपका
या नगरसेवकांनी पक्षविरोधी कारवाया आणि पक्षशिस्तीचा भंग केला. त्यामुळे पक्षाच्या सदस्य पदावरून पद मुक्त करण्यात येत आहे. यापुढे काँग्रेस पक्षाचे चिन्ह, पक्षाचा झेंडा, आणि दिलेल्या पदाचा वापर करू नये, असे पत्रक काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी नगरसेवकांना दिले आहे.
हेही वाचा -नव्या मंत्रीमंडळात "या" नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी? आयाराम ही होणार मंत्री?
या नगरसेवकांनी पक्षविरोधी कारवाया आणि पक्षशिस्तीचा भंग केला. त्यामुळे पक्षाच्या सदस्य पदावरून पद मुक्त करण्यात येत आहे. यापुढे काँग्रेस पक्षाचे चिन्ह, पक्षाचा झेंडा, आणि दिलेल्या पदाचा वापर करू नये, असे पत्रक काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी नगरसेवकांना दिले आहे. त्यांनी नवापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिरिषकुमार सुरूपसिंग नाईक यांचा प्रचार न करता विरोधातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा प्रचार केल्याप्रकरणी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी ही कारवाई केली.