महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 15, 2021, 4:22 PM IST

ETV Bharat / state

हृदयद्रावक..! कोरोना पॉझिटिव्ह पतीच्या मृत्यूनंतर ३ वर्षांच्या चिमुकल्यासह पत्नीची आत्महत्या

कोरोना पॉझिटिव्ह पतीच्या निधनानंतर संसार कसा चालवायचा, या विवंचनेत सापडलेल्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लोहा शहरात घडली. काल तिच्या पतीचे निधन झाले होते. पतीच्या निधनाची माहिती मिळताच पत्नीने आपल्या तीन वर्षांच्या चिमुकल्यासह तलावात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

Husband death wife suicide loha
माय लेक आत्महत्या लोहा

नांदेड - कोरोना पॉझिटिव्ह पतीच्या निधनानंतर संसार कसा चालवायचा, या विवंचनेत सापडलेल्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लोहा शहरात घडली. काल तिच्या पतीचे निधन झाले होते. पतीच्या निधनाची माहिती मिळताच पत्नीने आपल्या तीन वर्षांच्या चिमुकल्यासह तलावात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

माहिती देताना नातेवाईक आणि पोलीस निरीक्षक भागवत कदम

हेही वाचा -नांदेड जिल्ह्यात १ हजार ६६४ व्यक्ती कोरोनाबाधित तर २७ जणांचा मृत्यू

लॉकडाऊनमुळे भटक्या समाजावर उपासमारीची वेळ

लोहा शहरात आंध्रप्रदेशातील अम्मापुरम येथून उदरनिर्वाहासाठी आलेले एक कुटुंब दररोज चटई विकून व मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत असे. या कुटुंबाला रोजच्या जगण्याचा संघर्ष करावा लागायचा. त्यातच लॉकडाऊनचे निर्बंध कडक केल्यामुळे संसार कसा चालवायचा, असा प्रश्न या कुटुंबीयांपुढे होता. रोजच्या संघर्षात घरातल्या कर्त्या पुरुषालाच कोरोनाने घेरले. पती पॉझिटिव्ह आल्यानंतर तो लोहा येथील कोविड सेंटर येथे दाखल झाला. तीन दिवसांच्या उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही बातमी पत्नीला कळताच तिने तीन वर्षांच्या चिमुकल्यासह तलावात उडी मारून आत्महत्या केली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

कर्त्या पुरुषाच्या निधनानंतर संसार उघड्यावर

महाराष्ट्रात नव्हे तर सबंध देशात कोरोना महामारीने थैमान घातले असून दिवसेंदिवस मृत्यूची संख्या वाढत आहे. घरातील करत्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या पश्चात असलेल्या कुटुंबाने जगावे कसे, याची धास्ती अनेकांना लागली आहे. या विवंचनेतून लोहा येथील एका पत्नीने तीन वर्षांच्या चिमुकल्यासह आपली जीवनयात्रा संपवली. वडील कोरोना आजाराने वारले, तर आईने तीन वर्षीय मुलासह आत्महत्या केली. तिच्या पश्चात तिचा एका मुलगा आणि एक मुलगी असून ते उघड्यावर पडले आहेत.

लोहा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

नवऱ्याच्या निधनानंतर तीन मुलांना घेऊन संसाराचा गाडा चालणार कसा, या चिंतेने पत्नीने आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी लोहा पोलीस ठाण्यात १३/२०२१ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा -खासदार हेमंत पाटील यांनी घेतला नांदेड जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा

ABOUT THE AUTHOR

...view details