महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कॅनॉलच्या पाण्यात बुडून दोन मुलीचा मृत्यू; अर्धापूर तालुक्यातील घटना

चाभरा तांडा येथील महिला व मुली शनिवारी कॅनॉलवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी कपडे धुत असताना कोमल व काजल या दोन मुलीचा तोल गेल्याने त्या पाण्यात पडल्या व पाण्यात वाहून गेल्या. दरम्यान, यापैकी एकीचा मृतदेह चेनापूर तांडा येथील कॅनॉलवर रविवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास आढळून आला. तर दुसऱ्या मुलीचा मृतदेह चाभरा शिवारातील कॅनॉलमध्ये सायंकाळी सापडला.

By

Published : May 21, 2019, 10:14 AM IST

मृत कोमल राठोड व काजल राठोड

नांदेड - कॅनॉलच्या पाण्यात बुडून दोन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कोमल इंदल राठोड (वय १३) व काजल देवीदास राठोड (वय १२) असे या मुलींची नावे आहेत.

याबाबत अर्धापूर पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाभरा तांडा येथील महिला व मुली शनिवारी कॅनॉलवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी कपडे धुत असताना कोमल व काजल या दोन मुलीचा तोल गेल्याने त्या पाण्यात पडल्या व पाण्यात वाहून गेल्या. त्यानंतर पोलिसांनी या दोन मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली.

दरम्यान, एकीचा मृतदेह चेनापूर तांडा (ता.अर्धापूर) येथील कॅनॉलवर रविवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास आढळून आला. तर दुसऱ्या मुलीचा मृतदेह चाभरा शिवारातील कॅनॉलमध्ये सायंकाळी सापडला. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details