महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना नियमावलीचे उल्लंघन; नांदेड पालिकेकडून तीन दुकाने सील

कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या तीन दुकानांना मंगळवारी (दि.१४ जुलै) सील करण्यात आले असून, २१ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

By

Published : Jul 16, 2020, 1:20 PM IST

solapur municipal corporation
solapur municipal corporation

नांदेड - कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या तीन दुकानांना मंगळवारी (दि.१४ जुलै) सील करण्यात आले असून, २१ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात १२ जुलैच्या मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू केलेली आहे. त्यांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त डॉ.सुनील लहाने यांनी सहा क्षेत्रीय कार्यालयातील पूर्वीचे ६ पथक व संचारबंदी काळात १५ असे एकूण २१ कोरोना नियंत्रण पथकाची स्थापना केलेली आहे. प्रत्येक पथकात कर्मचारी नियुक्त कण्यात आले आहेत. संचारबंदी काळात दुकाने चालू ठेवल्याने क्षेत्रीय कार्यालय क्र.१ तरोडा सांगवी अंतर्गत सांगवी भागात शिवा ट्रेडींग कंपनीचे पाणी फिल्टर व किराणा सील करण्यात दुकान आले.

क्षेत्रीय कार्यालय क्र.३ गणेशनगर अंतर्गत अरविंदनगर येथील शिल्ड कॉम्प्युटर शॉपी व निझामकॉलनी येथील बेस्ट बकरा मटन शॉप सील करण्यात आले. तसेच सोशल डिस्टंसिंग न पाळणे, तोंडाला मास्क न लावल्याने क्षेत्रीय कार्यालय १ने (२८) जणांकडून रु.३ हजार ९००, क्षेत्रीय कार्यालय क्र. ३ ने (१६३) जणांकडून रुपये १६ हजार ३००, क्षेत्रीय कार्यालय क्र. ४ वजीराबाद ने (८) जणांकडून रु. १ हजार ५०० रुपये असा एकूण (१८६) जणांकडून रुपये २१ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला. आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त विलास भोसीकर, उपआयुक्त सुधिर इंगोले यांच्या नियंत्रणाखाली सहाआयुक्त संजय जाधव, सहा.आयुक्त राजेश चव्हाण, सहा.आयुक्त प्रकाश गच्चे यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत भाग घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details