नांदेड जिल्ह्यात 379 आरोग्य उपकेंद्रांमार्फत लसीकरणासाठी विशेष मोहीम
नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 45 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या बीपी, शुगर व इतर गंभीर आजारांच्या व्यक्तींसाठी आज जिल्ह्यातील 379 आरोग्य उपकेंद्रांवर कोरोना लसीकरणाची मोहिम सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.
नांदेड - नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 45 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या बीपी, शुगर व इतर गंभीर आजारांच्या व्यक्तींसाठी आज जिल्ह्यातील 379 आरोग्य उपकेंद्रांवर कोरोना लसीकरणाची मोहिम सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. ग्रामीण भागात कोरोनाच्या प्रादुर्भावापासून अशा व्यक्तींची सुरक्षा व्हावी यासाठी ही विशेष मोहीम नांदेड जिल्ह्यात सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 6 हजार 500 व्यक्तींना लसीकरण -
जिल्ह्यात 379 आरोग्य उपकेंद्र असून यात 49 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या 49 प्राथमिक आरोग्य केंद्रात पूर्वीपासूनच लसीकरण सुरु केले असून आता नव्याने 330 उपकेंद्रांची लसीकरणासाठी भर पडली आहे. सर्वच तालुक्यातील आज निवड उपकेंद्रापासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेत 6 हजार 500 पेक्षा अधिक व्यक्तींनी आज लस घेतली. उद्यापासून टप्प्या-टप्प्याने सर्व केंद्र पूर्ण कार्यक्षमतेने सुरु करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.
याच केंद्रांवर 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींनाही लसीकरणाच्या टप्प्यात घेतले जाणार आहे. ग्रामीण आरोग्य विभागातर्फे एवढ्या व्यापक प्रमाणात नांदेड जिल्ह्यात ही मोहिम प्राथमिक स्तरावर सुरु करण्यात आली आहे. यासाठी लागणारे वैद्यकिय पथक ग्रामीण आरोग्य विभागाने तयार ठेवले असून जिल्हा प्रशासनामार्फत त्याचे संयोजन केले जात आहे.