नांदेड- येथील सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा परिसरात झालेल्या गोंधळाबाबत राज भवन कार्यलयाने दखल घेतली आहे. या 2021 मध्ये श्री सचखंड गुरुद्वारा येथे होला मोहल्ला कार्यक्रमाच्या ( Hola Mohalla Nanded ) मिरवणुकीवरून पोलीस आणि शीख तरुणांमध्ये वाद झाला होता. याबाबतीत सखोल चौकशी करावी आणि निर्दोषांवरील गुन्हे मागे घ्यावे, अशी सूचना अवर सचिव जयराज चौधरी यांनी नांदेडचे पोलीस अधीक्षक ( Superintendent of Police ) यांना पत्राद्वारे केली आहे, अशी माहिती गुरुद्वारा बोर्डचे माजी सचिव रणजितसिंग कामठेकर यांनी दिली.
होला मोहल्ला मिरवणुकीवरून झाला होता वाद -मागील वर्षी सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा परिसरात होला मोहल्ला कार्यक्रमावेळी कोविडच्या नियमांचे पालन न केल्यामुळे पोलिसांनी या मिरवणुकीला रोखले होते. यावरून शीख समाजाच्या भावना दुखवल्या गेल्या होत्या. या वादात शीख तरुण आणि पोलीस यांच्या शाब्दिक चकमक होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यात काही पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले होते.