नांदेड -संजय बियाणीच्या हत्येनंतर कुटुंबात कलह ( Family feud after Sanjay Biyani's murder ) सुरू झाला आहे. अनिता बियाणी यांच्या तक्रारी नंतर प्रवीण बियाणी यांच्यावर गुन्हा दाखल ( Case filed against Praveen Biyani ) झाला होता.आता संपत्तीच्या वारसदार म्हणून अनिता बियाणी ( Anita as heir of Biyani Estate ) यांनी दाखल केलेल्या दाव्यावर एक महिलेने आक्षेप ( One woman objected estates claim) घेतला आहे. अनिता बियाणी यांनी संपत्तीचे वारसदार म्हणून न्यालायत दावा दाखल केला होता. त्याला आता एक महिलेने आक्षेप घेतला आहे. तीने आपल्या ४ वर्षीय मुलगी या संपत्तीची वारसदार असल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणात आता २४ जून रोजी सुनावणी होणार आहे.
5 एप्रिलला त्यांच्यावर झाडल्या गोळ्या- बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी यांची 5 एप्रिल रोजी त्यांच्या शारदानगर येथील घरासमोर, दुचाकीवरील दोघांनी गोळ्या झाडून हत्या केली. हत्या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी विविध राज्यांतून 11 आरोपींना अटक केली आहे. गुन्ह्यात वापरलेली व आरोपींनी जाळून टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेली पल्सर दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. सुरुवातीला अटक केलेले 9 आरोपी 13 जूनपर्यंत पोलिस कोठडीत होते. त्यांची पोलिस कोठडी संपल्याने 9 आरोपींना सोमवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले.