महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मदतीसाठी धावले आरएसएस कार्यकर्ते, 45 दिवसांपासून करतायेत गरजूंच्या जेवणाची व्यवस्था

लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असलेले कामगार आणि गोरगरीब यांचे हाल होत आहेत. मात्र, यातील कोणीही उपाशी राहू नये याची काळजी मुखेड येथील आरएसएस कार्यकर्ते घेत आहेत. गेल्या 45 दिवसांपासून मुखेड शहरातील सर्व आरएसएसचे कार्यकर्ते गरजूंच्या जेवणाची व्यवस्था करत आहेत.

file photo
प्रतिकात्मक फोटो

By

Published : May 12, 2020, 2:10 PM IST

नांदेड- लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असलेले कामगार आणि गोरगरीब यांचे हाल होत आहेत. मात्र, यातील कोणीही उपाशी राहू नये याची काळजी मुखेड येथील आरएसएस कार्यकर्ते घेत आहेत. गेल्या 45 दिवसांपासून मुखेड शहरातील सर्व आरएसएसचे कार्यकर्ते गरजूंच्या जेवणाची व्यवस्था करत आहेत.

आरएसएसचे हे कार्यकर्ते मुखेड शहारतील अनेक भागात फिरून गरजूंपर्यंत जेवण पोहोचवत आहेत. कधी पोळी - भाजी, तर कधी भात, खिचडी तयार करून पाकिटांमध्ये पॅक करुन गरजूंना घरपोच पुरविले जात आहे. गेल्या 45 दिवसांपासून मुखेड शहरात हा उपक्रम नित्यनेमाने राबवला जात आहे. यामुळे शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकऱ्यांचे कौतुक होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details