नांदेड - जिल्ह्यात आज जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाला आहे. मागील आठवड्यात उष्णतेच्या लाटेने नांदेडकर हैराण झाले होते. मात्र, आजच्या पावसाने नांदेडकरांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे.
नांदेड जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू
मागील आठवड्यात उष्णतेच्या लाटेने नांदेडकर हैराण झाले होते. मात्र, आज नांदेडमध्ये झालेल्या जोरदार पावसाने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करून हळद लागवड सुरू केली आहे.
पाऊस
नांदेड जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी मशागत केली असून पेरणीसाठी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होते. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करून हळद लागवड सुरू केली आहे. काल आणि आज दोन दिवस पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी पेरणी सुरू करण्याची शक्यता आहे.