नांदेड - येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ कार्यालय सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे नांदेडसह परभणी, हिंगोली, लातूर जिल्ह्यातील शासकीय इमारतींच्या कामांना गती मिळणार आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.
पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश -
नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर अंतर्गत मोठ्या प्रमाणावर इमारतीची कामे मंजूर आहेत. मात्र, या कामाच्या वास्तुविशारदीय कामांसाठी औरंगाबाद स्थित कार्यालयात जावे लागते. तसेच इमारतीच्या या कामांवर वास्तुविशारदीय दृष्टीकोनातून कार्यान्वयन करणे जिकीरीचे होत आहे. तसेच किनवट, माहूर, हदगांव, भोकर यांसारख्या दुर्गम आदिवासी तालुक्यातील अधिकाऱ्यांना औरंगाबाद येथे वास्तुविशारदीय दृष्टीकोनातून पाठपुरावा करणे नेहमी जिकीरीचे होत आहे. तसेच, सद्य:स्थितीत नांदेड येथे इमारतीच्या कामांचा ओघ पाहून वरिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ कार्यालय स्थापन करण्यासाठी अशोक चव्हाण यांनी पाठपुरावा केला होता.
हेही वाचा -राज्य सरकारकडून राज्य मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली जाणार