दंगलींविषयी रामदास आठवलेंचे मत नांदेड :सध्या दंगलीवरून राज्यभर एकच गाजावाजा सुरू असताना विरोधकांनी दंगलीसाठी केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. सरकारच्या वतीने ह्या दंगली घडवण्याचा कट असल्याचा आरोप ते करत आहेत. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सरकारची बाजू मांडली. यासाठी त्यांनी पाकिस्तानला कारणीभूत ठरविले आहे. दंगलींमागे विरोधकांचाही हात आहे की काय याचाही तपास झाला पाहिजे, असे ते म्हणाले.
आम्ही कशाला दंगली करू? :आमचे सरकार असल्याने आम्ही कशाला दंगली करू असा प्रतिप्रश्नही मंत्री रामदास आठवले यांनी उपस्थित केला. राज्यात शांतता प्रस्थापित व्हावी हे कुठल्याही सरकारचे प्रथम कर्तव्य आहे. विरोधकांनी सरकारवर लावलेले आरोप अयोग्य आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका 'सबका साथ, सबका विकास' आहे. केंद्र सरकारच्या योजना सर्व समाजासाठी आहेत. औरंगजेबाचा फोटो आणून अशा प्रकारे दंगली घडविल्या जातात. यामागे पाकिस्तानचा हात आहे की काय असा प्रश्न रामदास आठवले यांनी उपस्थित केला.
आम्हाला शांतता पाहिजे:भाजप सत्तेत असते त्यावेळेस विरोधकांकडून अशा दंगली घडवल्या जातात की काय? असा प्रश्न उपस्थित होतो. कोल्हापूरमध्ये एका मुस्लिम युवकाने झळकवलेल्या औरंगजेबाच्या फोटोवरून झालेला वाद हा नेमका कशामुळे घडला हे तपासण्याची गरज आहे. आम्हाला शांतता पाहिजे. आम्ही कशाला दंगली घडवू? जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम हटविल्यानंतर तेथील तरुणांना फूस लावली जाते. यात पाकिस्तानचा हाथ असू शकतो. मुस्लिम समाज हिंदू समाजाच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करतोय; पण काही शक्ती ह्या सोबत राहू देत नाहीत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी व्यक्त केली.
हेही वाचा:
- NCP Anniversary in Delhi: शरद पवारांनी अखेर भाकरी फिरविली, सुप्रिया सुळे यांच्यासह प्रफुल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड
- Sharad Pawar On Lok Sabha Election 2024 : शरद पवारांचे टार्गेट लोकसभा निवडणूक 2024, पक्षातील 'या' नेत्यांच्या खांद्यावर टाकली जबाबदारी
- Congress Demands White Paper : देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस, सरकारने श्वेतपत्रिका जारी करावी - कॉंग्रेस