नांदेड : तेलंगणा सीमेवरील palaj ganesh temple Telangana भोकर तालुक्यातील पाळज palaj ganesh temple Bhokar Telengana हे गाव. मातृभाषा तेलगु. महाराष्ट्रात असूनही येथील चालीरीती व अधिक व्यवहार मात्र तेलंगणाशी असतो. रूढी परंपरा दाक्षिणात्य संस्कृतीशी जुळणाऱ्या असल्या तरी गावकरी मात्र मराठमोळं सण मोठ्या भक्तिभावाने जपतात. हा सण म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव Ganesh Festival in Telangana खरं तर पाळज फेस्टिव्हल palaj Festival म्हणायला हवे. गणेश म्हणजे गावाचं वैभव, आराध्य दैवत तर तेलंगणातील भक्ताचा कंठमणीच. पाजळ गावातील या मंदिरात दरवर्षी अकरा दिवसाच्या गणेशोत्सवात Ganesh Festival in palaj Village चार ते पाच लाख भाविक दर्शन घेतात. हे अकरा दिवस म्हणजे ग्रामस्थांची दिवाळी व दसराच असतो.
ग्रामप्रमुखाच्या स्वप्नात श्रीगणेशाने दर्शन दिल्याची आख्यायिकामराठवाडा मुक्तीसंग्रामच्या इतिहासाच्या पानावर किनी व पाळज या गावाचे नावे तेवढेच महत्त्वाचे. यावेळी या दोन्ही गावातील अणेकांनी हौतात्म्य पत्करले. कित्येकांनी घरावर तुळशीपत्र ठेवून अस्मानी संकटाचा मुकाबला केला. वैभवसंपन्न किनी पाळजची १९४८ ला राखरांगोळी झाली. या दरम्यान ग्रामस्थांना श्रीगणेशाची मूर्ती स्थापना करण्याची निकड भासू लागली. निजामाच्या जुलमी राजवटीत हे मोठे आव्हानात्मक काम होते. यावेळी महामारी असताना एका रात्री संटी भोजन्ना या ग्रामप्रमुखाच्या स्वप्नात विघ्नहर्ता श्रीगणेशाने दर्शन देऊन संकट निवारणार्थ प्रेरणा दिली आणि श्रींच्या प्रतिमेची स्थापना करून तिचे विसर्जन न करण्यास सांगितले.