महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 2, 2020, 11:29 AM IST

ETV Bharat / state

विद्यार्थिनी लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींच्या कोठडीमध्ये वाढ

बिलोली तालुक्यातील विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणातील आरोपींच्या कोठडीमध्ये न्यायालयाने वाढ केली आहे. मुख्य आरोपी सय्यद रसूलच्या न्यायालयीन कोठडीत आणि तपासाची गती लक्षात घेता सहआरोपी प्राचार्य धनंजय शेळके, मुख्याध्यापक प्रदीप पाटील यांची पुन्हा चार दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली.

विद्यार्थीनीवर अत्याचार
विद्यार्थीनीवर अत्याचार

नांदेड -बिलोली तालुक्यात एका शाळेतील शिक्षकानेच सहावीतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी सय्यद रसूल, सहआरोपी प्राचार्य धनंजय शेळके, मुख्याध्यापक प्रदीप पाटील यांना सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायमूर्ती विक्रमादित्य मांडे यांनी मुख्य आरोपी सय्यद रसूलच्या न्यायालयीन कोठडीत आणि तपासाची गती लक्षात घेता सहआरोपी प्राचार्य धनंजय शेळके, मुख्याध्यापक प्रदीप पाटील यांची पुन्हा चार दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली.

या प्रकरणातील मुख्य आरोपी सय्यद रसूलच्या अटकेनंतर चौकशीला गती आली होती. हे प्रकरण दडवून ठेवण्यासाठी मदत करणारे सहआरोपी प्राचार्य धनंजय शेळके, मुख्याध्यापक प्रदीप पाटील यांना पोलिसांनी २६ जानेवारीला पूर्णा येथून अटक केली होती. त्यांना जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

हेही वाचा - 'गोमूत्र आणि शेणाद्वारे केला जाऊ शकतो कोरोना विषाणूवर उपचार '

पीडित विद्यार्थिनीला आरोपी शिक्षक सय्यद रसूल आणि दयानंद राजुळे यांनी अश्लील चित्रफित दाखवून अत्याचार केला होता. ही घटना समोर आल्यानंतर संबंधित आरोपींविरुद्ध पोक्सो आणि अ‌ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल करण्यापूर्वी विद्यार्थिनीची आई मुख्याध्यापक प्रदीप पाटील आणि प्राचार्य धनंजय शेळके यांच्याकडे तक्रार घेऊन गेली होती. मात्र, मुलीला न्याय मिळवून देण्याऐवजी आरोपी रसूल सय्यद आणि दयानंद राजुळे यांना पाठीशी घालत प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details