नांदेड - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. नांदेड मतदारसंघात एकूण १४ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. या लोकसभेसाठी १७ लाख १७ हजार ८२५ मतदार मतदान करणार आहेत.
नांदेडमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज
नांदेड लोकसभेसाठी २ हजार २८ मतदान केंद्र आहेत. त्यापैकी २८८ मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱयांची नजर असणार आहे.
यावेळच्या निवडणुकीमध्ये दिड लाख नवमतदार आहेत. त्यामुळे नवमतदारांचे मत निवडणूक निकालावर निश्चितच प्रभाव पाडतील, असे चित्र आहे. नांदेड लोकसभेसाठी २ हजार २८ मतदान केंद्र आहेत. त्यापैकी २८८ मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱयांची नजर असणार आहे.
मतदान प्रकिया सुरळीत पार पडण्यासाठी ११ हजार १५५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करताना दिसत आहेत. आज मतदानासाठी साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी दिवसभर कर्मचारी कामात व्यस्त असल्याचे दिसून आले.