नांदेड -स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम पित्यास भोकर जिल्हा सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. पोक्सो कायद्यान्वये दाखल झालेल्या या गुन्ह्यात भोकर पोलिसांनी अवघ्या ४८ दिवसांत पित्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते, तर न्यायालयानेही ९ महिन्यात या खटल्याचा निकाल दिला.
नांदेडमध्ये स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा
भोकर शहरात १ मार्च २०१९ ला एका नराधमाने स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश एम. एस. शेख यांनी आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप आणि १४ हजार ५०० रुपये दंड सुनावला आहे.
भोकर शहरात १ मार्च २०१९ ला एका नराधमाने स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास चाकून भोसकून मारण्याची धमकी देखील दिली होती. पीडित मुलीने सर्व प्रकार शाळेतील शिक्षिका आणि मुख्याध्यापिका यांना सांगितला. शिक्षकांनी मुलीला धीर देत ही घटना आजोबांना सांग, असे सांगितले. त्यानंतर मुलीने ही घटना आजोबांना सांगितली. त्यावरून कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी पीडित मुलीचा जवाब नोंदवून घेतला. पोलीस उपनिरीक्षक पूनम सूर्यवंशी यांनी आरोपीविरोधात भोकर पोलिसांत बलात्कार, पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. तसेच जिल्हा सत्र न्यायाधीश एम. एस. शेख यांनी आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप आणि १४ हजार ५०० रुपये दंड सुनावला आहे.