नांदेड-शेताजवळून पावसाच्या पाण्याचा नाला काढण्यावरुन झालेल्या किरकोळ वादातून शंकरराव महाजन यांचा डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून झाल्याची घटना सगरोळी शिवारात घडली आहे. या घटनेतील आरोपीविरुद्ध बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी फरार झालेल्या आरोपीना अटक केली आहे.
सगरोळी येथील शेतकरी शंकरराव हणमंतराव महाजन वय ६५ वर्षे आणि परशुराम दत्तू इलतेपोड वय ४५ वर्षे व त्याची दोन मुले यांच्यात शेतातील पावसाच्या पाण्याचा नाला काढण्यावरुन वाद झाला. या किरकोळ वादात आरोपी परशुराम इलतेपोड याने महाजन यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घातल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.