महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शुल्लक कारणावरून तरुणाची ब्लेडने वार करुन हत्या; आरोपी फरार

एका २० वर्षीय तरुणाने गोपाळ सुरेश जाधव (१८) याच्यावर ऑपरेशन करण्यासाठी वापरात येणाऱया धारदार ब्लेडने वार केले.

By

Published : May 16, 2019, 8:24 PM IST

नांदेड पोलीस ठाणे

नांदेड- जुना कौठा परिसरातील नरोबा मंदिरासमोर एकाने तरुणावर ब्लेडने वार करुन ठार केले. ही घटना बुधवारी रात्री ८ वाजण्याचा सुमारास घडली.

नांदेड पोलीस ठाणे

बुधवारी रात्री किरकोळ कारणांवरुन दोन तरुणांमध्ये वाद निर्माण झाला. यावेळी एका २० वर्षीय तरुणाने गोपाळ सुरेश जाधव (१८) याच्यावर ऑपरेशन करण्यासाठी वापरात येणाऱया धारदार ब्लेडने वार केले. यात रक्तबंबाळ झालेल्या गोपाळला गंभीर अवस्थेत जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. पुढील तपासणीसाठी मृतदेह विष्णुपुरी येथील रुग्णालयात हलवण्यात आला. या घटनेनंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे सहकाऱयांसह घटनास्थळी दाखल झाले. याठिकाणी पोलिसांचा अतिकरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणातील आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details