महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 15, 2020, 2:10 PM IST

ETV Bharat / state

फ्लॅट खरेदीसाठी विवाहितेचा छळ; 2 कोटीं न दिल्याने घराबाहेर हाकलले

तरोडा खुर्द भागातील शिवाजीनगर येथे माहेरी राहणाऱ्या एका विवाहित महिलेचा पती संदीप माने (रा. पिंपळे सौदागर, पुणे) हा युएसए मध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहे. विवाहितेस माहेराहून फ्लॅट घेण्यासाठी 2 कोटी रुपये घेवून ये म्हणून पती संदीप हा नेहमीच थापड बुक्क्यांनी मारहाण करुन छळ करीत असत.

nanded
फ्लॅट खरेदीसाठी विवाहितेचा छळ; 2 कोटीं न दिल्याने घराबाहेर हाकलले

नांदेड -फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून तब्बल 2 कोटी रुपये घेवून ये म्हणून विवाहित महिलेस मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ केल्याप्रकरणी पती तसेच सासु, सासऱ्याविरोधात भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा -

रितेशला 'तुझे मेरी कसम'ची ऑफर आल्यानंतर काय म्हणाले होते विलासराव देशमुख?

तरोडा खुर्द भागातील शिवाजीनगर येथे माहेरी राहणाऱ्या एका विवाहित महिलेचा पती संदीप माने (रा. पिंपळे सौदागर, पुणे) हा युएसए मध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहे. विवाहितेस माहेराहून फ्लॅट घेण्यासाठी 2 कोटी रुपये घेवून ये म्हणून पती संदीप हा नेहमीच थापड बुक्क्यांनी मारहाण करुन छळ करीत असत. विवाहितेच्या सासु सासऱ्यांनीही तिचा शारिरीक आणि मानसिक छळ केला. पैसे घेवून येण्यास नकार दिल्यामुळे पती संदीप याने पत्नीला घराबाहेर हाकलून दिले. याप्रकरणी विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन भाग्यनगर पोलीस ठाण्यात पती संदीप माने, सासु सुभद्रा लक्ष्मण माने आणि सासरा लक्ष्मण यलप्पा माने यांच्या विरोधात भादंवि कलम 498 (अ), 323 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक सोनवणे हे करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details