नांदेड -महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सर्वच स्तरातून मदतीचे हात पुढे सरसावले आहेत. नांदेड येथील गुरुद्वारा बोर्डाकडूनही पूरग्रस्तांना मदत करण्यात आली आहे. मदत म्हणून विविध साहित्य, अन्नधान्य यांचे ३ ट्रक व २ रुग्णवाहिका पाठविले आहेत. यावेळी गुरुद्वारा साहिबचे जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची उपस्थिती होती.
नांदेड गुरुद्वाराकडून पूरग्रस्तांना मदत; अन्नधान्यांच्या ट्रकसह दोन रुग्णवाहिका पाठविल्या
राज्यभरातून पुरात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यात येत आहे. नांदेड येथील गुरुद्वारा बोर्डानेही पूरग्रस्तांना मदत म्हणून विविध साहित्य, अन्नधान्य यांचे ३ ट्रक व २ रुग्णवाहिका पाठविल्या आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर येथे महापूर आला असून अनेक गावे पाण्याखाली आहेत. त्यामुळे या ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यांच्या मदतीसाठी गुरुद्वारा बोर्डाने धाव घेतली असून अन्नधान्य व इतर साहित्यांचे तीन ट्रक आणि दोन रुग्णवाहिका पाठविण्यात आल्या आहेत.
महापुरामुळे दोन्ही जिल्ह्यांतील अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. शेकडो नागरिक पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत. पुराच्या पाण्यासोबतच महामारी पसरण्याचीही दाट शक्यता आहे. राज्यभरातून पुरात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यात येत आहे. त्यात गुरुद्वारा बोर्डनेही ३ ट्रक साहित्य व २ रुग्णवाहिका पाठविल्या. या बरोबर बोर्ड पदाधिकाऱ्यांचा एक जत्थाही पाठविण्यात आला आहे.