महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेस-राष्ट्रवादी-पीआरपी व मित्रपक्षांच्या आघाडीची २० फेब्रुवारीला नांदेडमध्ये प्रचार सभा

लोकसभा निवडणुका जाहीर होण्यासाठी आता काही दिवस शिल्लक आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी व मित्र पक्षांच्या आघाडीने प्रचाराचे रणशिंग फुंकण्याची घोषणा केली आहे.

By

Published : Feb 15, 2019, 11:15 PM IST

public meeting

नांदेड - लोकसभा निवडणुका जाहीर होण्यासाठी आता काही दिवस शिल्लक आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी व मित्र पक्षांच्या आघाडीने प्रचाराचे रणशिंग फुंकण्याची घोषणा केली आहे. या आघाडीची पहिली संयुक्त प्रचार सभा नांदेडमध्ये बुधवारी २० फेबु्रवारीला आयोजित केली आहे.

या सभेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, महाराष्ट्राचे प्रभारी व लोकसभेतील काँग्रेसचे नेते खासदार मल्लिकार्जुन खरगे, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार जोगेंद्र कवाडे यांच्यासह दिग्गज नेत्यांची उपस्थिती राहणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी दिली.
येथील स्टेडियम परिसरातील इंदिरा गांधी मैदानावर बुधवारी सायंकाळी ५ वाजता आयोजित केलेल्या या माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी उप मुख्यमंत्री छगन भुजबळ, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, गुजरात काँग्रेसचे प्रभारी खासदार राजीव सातव, रोहिदास पाटील, अब्दुल सत्तार, कमलकिशोर कदम, गंगाधर कुंटूरकर, जयप्रकाश दांडेगावकर, डी.पी.सावंत, आदी उपस्थित असणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी व मित्र पक्षांची राज्यातील ही पहिलीच संयुक्त प्रचार सभा आहे. या सभेची नांदेडमध्ये जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. या सभेनंतर २३ फेब्रुवारीला परळी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अशाच पध्दतीने सर्वपक्षीय प्रचार सभा घेण्यात येणार आहे. ही सभा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.
नांदेड येथे होणार्‍या या सभेस काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी व मित्र पक्षांचे कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येंनी उपस्थित राहावे असे आवाहन वसंत चव्हाण, अमिता चव्हाण यांनी केली आहे. यावेळी प्रदीप नाईक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व माजी बापूसाहेब गोरठेकर, काँग्रेसचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जि.प. अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, महापौर शिलाताई भवरे, माजी शंकर धोंडगे, ईश्वरराव भोसीकर, नागनाथ रावनगावकर, रोहिदास चव्हाण, हणमंत पाटील-बेटमोगरेकर, माधव जवळगावकर, रावसाहेब अंतापूरकर, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष महमंद खान पठाण, बी.आर.कदम, हरिहर भोसीकर, डॉ.सुनील कदम, रामनारायण काबरा, माधवराव पाटील- शेळगावकर, बापूराव गजभारे, विनोद भरणे, पप्पू कोंडेकर, वसंत सुगावे, विठ्ठल पावडे, शेख रऊफ जमिनदार, कविता कळसकर, प्रांजली रावणगावकर, अनुजा तेहरा उपस्थित होते.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details