नांदेड- लोकसभेत ऐतिहासिक विजय संपादन केल्यानंतर मतदारसंघातील पहिल्याच दौऱ्यात प्रताप पाटील चिखलीकर यांनी जनता दरबार घेण्याची घोषणा केली होती. दिलेला शब्द पाळून २२ ऑगस्टला भोकर, मुदखेड व अर्धापूर येथे खासदारांच्या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
खासदार प्रताप पाटील चिखलीकरांचा २२ ऑगस्टला मुदखेड, भोकरसह अर्धापूरला जनता दरबार
प्रताप पाटील चिखलीकर यांनी जनता दरबार घेण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
दौऱ्यात भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर
२२ ऑगस्टला भोकर विधानसभा क्षेत्रातील मुदखेड तहसील कार्यालयात सकाळी १० वाजता, भोकर तहसील कार्यालय येथे १२ वाजता व अर्धापूर तहसील कार्यालय येथे दुपारी ४ वाजता खासदारांचा जनता दरबार भरणार आहे. यावेळी सर्व विभागप्रमुख उपस्थित राहणार आहेत.
या जनता दरबारात त्या-त्या तालुक्यातील जनतेच्या अडचणी, गावची समस्या, प्रलंबित कामे, नव्याने घ्यावयाची कामे असे विषय चर्चीले जाणार आहेत. तेव्हा नागरिकांनी या जनता दरबाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Last Updated : Aug 20, 2019, 11:53 AM IST