महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 22 हजार 906 कोरोनाबाधित, 590 जणांचा मृत्यू

नांदेड जिल्ह्यात मंगळवारी 378 अहवालापैकी 354 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण कोरोनाबाधितांची संख्या आता 22 हजार 906 एवढी झाली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड

By

Published : Feb 16, 2021, 9:41 PM IST

नांदेड - जिल्ह्यात मंगळवारी 378 अहवालापैकी 354 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण कोरोनाबाधितांची संख्या आता 22 हजार 906 एवढी झाली. यातील 21 हजार 849 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 256 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु आहेत. त्यातील 10 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 590 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

मंगळवारी 21 कोरोना बाधितांची भर तर 25 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी-

जिल्ह्यात मंगळवार 16 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 21 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 8 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 13 बाधित आढळले आहेत. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 25 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.38 टक्के-

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय नांदेड 3, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 14, देगलूर कोविड रुग्णालय 1, खासगी रुग्णालय 3, हदगाव कोविड रुग्णालय 1, किनवट रुग्णालय 2, लोहा तालुक्यातर्गंत 1 असे एकूण 25 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.38 टक्के आहे.

जिल्ह्यात 256 बाधितांवर औषधोपचार सुरु-

जिल्ह्यात 256 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 16, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 16, किनवट कोविड रुग्णालय 15, हदगाव कोविड रुग्णालय 1, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 141, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 33, हैदराबाद येथे संदर्भीत 1, खासगी रुग्णालयात 31 रुग्ण आहेत.


सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे-

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 170 खाटा, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 96 खाटा उपलब्ध आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती-

  • एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 18 हजार 637
  • एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 91 हजार 321
  • एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 22 हजार 906
  • एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 21 हजार 849
  • एकुण मृत्यू संख्या-590
  • उपचारानंतर बाधित रुग्ण घरी (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 95.38 टक्के
  • आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00
  • आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-00
  • आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-395
  • रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-256
  • आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-10

ABOUT THE AUTHOR

...view details