नांदेड - गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या तीस वर्षाच्या मागणीला यश मिळाले आहे. गुरुद्वारा सचखंड बोर्डाला अल्पसंख्याक संस्थेचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेत मंत्रालय येथे बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवाब मलिक आणि अशोक चव्हाण यांच्यात बैठक
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांची बुधवारी मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी गुरुद्वारा सचखंड बिरदला अल्पसंख्याक संस्थेचा दर्जा देण्यात आला आहे. यावेळी अल्पसंख्याक विभागाचे सचिव, गुरुद्वारा बोर्डाचे सचिव स. रविन्दर सिंगजी बुंगई, गुरुद्वारा सचखंड बोर्ड आणि प्राचार्य स. गुरुबचन सिंग, यांची उपस्थिती होती.
तीस वर्षापासून होत असलेली मागणी मंजूर
अल्पसंख्याक दर्जा मिळावा यासाठी द्वारा बोर्डाकडून सातत्याने मागणी केली जात हाती. गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक संस्थेचा दर्जा शासनातर्फे देण्यात यावा त्यासाठी या बैठकीमध्ये सर्व बाबींचा विचार करण्यात आला. गुरुद्वारा सचखंड बोर्ड ही धार्मिक, सामाजिक व अल्पसंख्याक धर्माची संस्था आहे. त्यामुळे बोर्डाच्या शैक्षणिक संस्थांना शासनातर्फे त्वरीत अल्पसंख्याक संस्था दर्जा मिळावा यासाठी अल्पसंख्याक खात्याच्या सचिवांना निर्देश देण्यात आले. त्यानुसार गुरुद्वारा बोर्डाचे सचिव यांना प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आला.
गुरुद्वारा सचखंड बोर्डाने मानले आभार
तब्बल तीस वर्षाच्या मागणीला यश मिळाल्यानंतर गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे अध्यक्ष स. भूपिंदर सिंग मनहास, उपाध्यक्ष मा .गुरिंदर सिंग बावा, सदस्य व समन्वयक व सर्व सदस्य गुरुद्वारा सचखंड बोर्ड स. परमज्योत सिंग चाहेल आणि आदरणीय पंजप्यारे साहिवान यांनी आभार मानले.