महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुदखेडमध्ये बेशूद्ध बिबट्याला वनविभागाने दिले जीवदान

मुदखेड तालुक्यातील  माळकौठा शिवारात बेशुद्ध अवस्थेत बिबट्या आढळला. या बिबट्यावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वैद्यकीय उपचार करून या त्याला जीवदान दिले आहे. यानंतर बिबट्याला सुरक्षितपणे जंगलात सोडून देण्यात आले आहे.

By

Published : Nov 24, 2019, 8:59 PM IST

संग्रहित

नांदेड -मुदखेड तालुक्यातील माळकौठा शिवारात बेशुद्ध अवस्थेत बिबट्या आढळला. या बिबट्यावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वैद्यकीय उपचार करून त्याला जीवदान दिले आहे. यानंतर बिबट्याला सुरक्षितपणे जंगलात सोडून देण्यात आले आहे.

हेही वाचा - अजित पवारांचा व्हीप सर्वांना बंधनकारक - आशिष शेलार

दरेगावाच्या रस्त्यालगत शुक्रवारी एक बिबट्या आजारी अवस्थेत आढळला होता. विठ्ठल शिंदे यांच्या शेतात हा बिबट्या बेशुद्ध अवस्थेत सापडल्याने त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्याला याबाबत कल्पना दिली. त्यानंतर सहायक वनअधिकारी डी. एस. पवार आणि श्रीधर कवळे या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या बिबट्याला सुरक्षितपणे पकडून त्याच्यावर आवश्यक ते वैद्यकीय उपचार करण्यात आले. उपचार आणि आहाराची काळजी घेताच बिबट्या पूर्णपणे ठीक झाला.

बिबट्या ठीक होताच त्याला सुरक्षितपणे जंगलात नेऊन सोडण्यात आले. या संपूर्ण मोहिमेत नांदेडच्या वन्य जीव अभ्यासकाने देखील मदत केली. आजारानंतर झालेल्या उपचाराने बिबट्या धष्टपुष्ठ झाल्यानंतर बिबट्याला सुरक्षित स्थळी सोडण्यात आली, त्यावेळी बिबट्याने धूम ठोकली.

हेही वाचा - पवारांनी सुरुवात केली पवारच शेवट करतील - आमदार बच्चू कडू

ABOUT THE AUTHOR

...view details