महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात येत्या रविवारपासून 19 जुलैपर्यंत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू

जिल्ह्यात 5 जुलै 2020 ला म्हणजे येत्या रविवारी सकाळी 6 वाजेपासून ते 19 जुलै 2020 मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अप्पर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

नांदेड
नांदेड

By

Published : Jul 4, 2020, 10:34 AM IST

Updated : Jul 4, 2020, 1:14 PM IST

नांदेड - जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, म्हणून जिल्ह्यात 5 जुलै 2020 ला म्हणजे येत्या रविवारी सकाळी 6 वाजेपासून ते 19 जुलै 2020 मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अप्पर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

शस्त्रबंदी व जमावबंदीनुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा आणि विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

संबधित मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आणि नांदेड पोलीस अधिक्षक यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकाऱ्यांना आहेत.

Last Updated : Jul 4, 2020, 1:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details