महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात पावसाची दडी, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

नांदेड जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. दरम्यान, यंदा नांदेड जिल्ह्यातील 3 लाख 65 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. यात, सोयाबीन 1 लाख 88 हजार हेक्टर आणि कापसाची 1 लाख 20 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली.

nanded
nanded

By

Published : Jun 23, 2021, 10:39 PM IST

नांदेड - पाऊस लांबल्याने नांदेड जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीनच पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदा मृगनक्षत्राला चांगला पाऊस झाला. सलग तीन-चार दिवस पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली. जवळपास पन्नास टक्केवर खरीप पेरणी आटोपली आहे. पण गेल्या आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

जिल्ह्यात आतापर्यंत 49 टक्के पेरणी

जिल्ह्यात खरीप हंगामाचे पेरणीक्षेत्र 7 लाख 42 हजार हेक्टर आहे. यापैकी यावर्षी 3 लाख 65 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. सोयाबीन 1 लाख 88 हजार हेक्टर आणि कापसाची 1 लाख 20 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. आतापर्यंत 49 टक्के पेरणी झाली.

आठ दिवसांपासून पावसाची दडी

गेल्या आठ दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. पाऊस लांबल्याने अनेक शिवारात सोयाबीन आणि कापूस उगवलाच नाही. तर काही भागात पावसाअभावी पिके सुकू लागली आहेत.

दुबार पेरणीची तयारी

पाऊस नसल्याने आता शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची तयारी सुरू केली आहे. साधारणपणे सोयाबीनला एकरी 7 हजार, तर कापसाला एकरी 6 हजार रुपये खर्च शेतकऱ्यांना येतो. आता पुन्हा तितकाच खर्च करावा लागणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमूळे अडचणीत असलेला शेतकरी पुन्हा संकटाच्या गर्तेत आकडत चालला आहे.

पाऊसमान आणि पेरणी

* आतापर्यंत 169 मिली मीटर पाऊस

* खरीप हंगामात पेरणी क्षेत्र - 7 लाख 42 हजार हेक्टर

पेरणी

* 3 लाख 65 हजार हेक्टर

* सोयाबीन - 1 लाख 88 हजार हेक्टर

* कापूस - 1 लाख 20 हजार हेक्टर

* एकूण पेरणी- 49 %

हेही वाचा -धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या; आई-वडिलांनी मुलांसह संपवलं जीवन

ABOUT THE AUTHOR

...view details