महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिलासादायक: नांदेडमध्ये दुसऱ्यांदा कोरोना रुग्णसंख्या शून्यावर

नांदेड जिल्ह्यात रविवारी एकाही नागरिकांचा मृत्यू झालेला नाही आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत 2 हजार 655 एवढे मृत्यू झाले आहेत. तर सोमवारी जिल्ह्यातील 5 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील 5 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आजमितीस जिल्ह्यात 42 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.

By

Published : Aug 3, 2021, 11:52 AM IST

corona patients zero in Nanded second time
नांदेड जिल्ह्यात दुसऱ्यांदा कोरोना रुग्णसंख्या शून्यावर

नांदेड - जिल्ह्यात रविवारी प्राप्त झालेल्या 2 हजार 18 अहवालांपैकी एकही कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आला नाही आहे. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या 90 हजार 179 एवढी झाली असून यातील 87 हजार 482 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यातील 42 रुग्ण उपचार घेत असून यातील 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. रुग्णसंख्या न वाढणे आणि मृत्यू न होणे दुसऱ्यांदा घडले आहे. त्यामुळे किमान सध्यातरी जिल्ह्यात दिलासादायक चित्र दिसत आहे.

मृत संख्याही शून्यावर -

जिल्ह्यात रविवारी एकाही नागरिकाचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत 2 हजार 655 एवढे मृत्यू झाले आहेत. तर सोमवारी जिल्ह्यातील 5 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील 5 व्यक्तींना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

42 कोरोनाबाधितांवर औषधोपचार सुरु -

जिल्ह्यात 42 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, किनवट कोविड रुग्णालय 1, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 35, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 व्यक्ती उपचार घेत आहेत.

उपलब्ध खाटांची संख्या -

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 130, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाचा अहवाल -

  • एकूण घेतलेले नमुने - 6 लाख 61 हजार 669
  • एकूण निगेटिव्ह नमुने - 5 लाख 59 हजार 525
  • एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती - 90 हजार 179
  • एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या - 87 हजार 482
  • एकूण मृत्यू संख्या - 2 हजार 655
  • उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.00 टक्के
  • रविवारी नमुने तपासणी अनिर्णीत संख्या - निरंक
  • रविवारी नमुने नाकारण्यात आलेली संख्या - 4
  • प्रलंबित नमुने तपासणी संख्या - 35
  • रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती - 42
  • आजमितीस अतिगंभीर प्रकृती असलेले रुग्ण- 3

ABOUT THE AUTHOR

...view details