नांदेड- केंद्रामध्ये सत्तेत असलेले भाजप सरकार हे आरक्षण विरोधी असल्याचा आरोप करत काँग्रेसने आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. भाजपप्रणित केंद्र सरकारने व भाजपची मातृसंस्था असलेल्या आरएसएसने देशातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे आरक्षण रद्द करण्याचा घाट घातला असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसने केला.
केंद्र सरकार आरक्षण विरोधी; काँग्रेसचा आरोप, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन - Nanded latest news
न्यायालयामध्ये केंद्रशासनाने वारंवार आरक्षणाविरोधात भूमिका घेतली आहे. याच्या निषेधार्थ नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलने करण्यात आले.

न्यायालयामध्ये केंद्रशासनाने वारंवार आरक्षणाविरोधात भूमिका घेतली आहे. याच्या निषेधार्थ नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलने करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात देण्यात आलेल्या घोषणांनी जिल्हाधिकारी परिसर दणाणून गेला होता.
या धरणे आंदोलनात काँग्रेसचे माजी मंत्री डी.पी.सावंत, आमदार अमरनाथ राजूरकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नगेलीकर, महापौर दीक्षा धबाले, जि.प.सभापती संजय बेळगे, बाळासाहेब पा. रावणगावकर, अॅड. रामराव नाईक, महिला काँग्रेस अध्यक्षा कविताताई कळसकर, युवक जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील कोंडेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, विजय येवनकर, तालुकाध्यक्ष निलेश पावडे, काँग्रेसचे युवक शहर जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे आदींची उपस्थिती होती.