महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये उभारणार कौशल्य विकासाधारित ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’

मलिक म्हणाले की, कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणासाठी तसेच कौशल्याधारित व्यवसायासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची निर्मिती करण्यात येणार आहे. नांदेडमध्ये हे केंद्र सुरू झाल्यामुळे तेथील युवकांना चांगले प्रशिक्षण मिळणार आहे. या केंद्रासाठी 20 एकर जागेची आवश्यकता आहे.

By

Published : Feb 10, 2021, 9:59 PM IST

ashok chavhan
अशोक चव्हाण

नांदेड -जिल्ह्यातील युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रशिक्षण मिळावे, यासाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ सुरू करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केली होती. या मागणीस कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी तत्वतः मान्यता दिली. या केंद्रासाठी जागा व इतर बाबीसंदर्भात तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे नवाब मलिक यांनी दिले. नांदेडमध्ये ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ सुरू करणे, आर्थिक मागास विद्यार्थी व अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभारणे यासंदर्भात अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व नवाब मलिक यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली.

केंद्रासाठी 20 एकर जागेची आवश्यकता -

मलिक म्हणाले की, कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणासाठी तसेच कौशल्याधारित व्यवसायासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची निर्मिती करण्यात येणार आहे. नांदेडमध्ये हे केंद्र सुरू झाल्यामुळे तेथील युवकांना चांगले प्रशिक्षण मिळणार आहे. या केंद्रासाठी 20 एकर जागेची आवश्यकता आहे. यासाठी तसेच सेंटर उभारण्यासाठी आवश्यक बाबीचा प्रस्ताव सादर करावा.

वसतीगृहासाठी जागेचा प्रस्ताव पाठवावा -

आर्थिक मागास घटकातील विद्यार्थी तसेच अल्पसख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण संस्था व पॉलिटेक्निक कॉलेजमागील जागा द्यावी, अशी मागणी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी केली. वसतीगृह उभारण्यास मान्यता देऊन यासंदर्भातील प्रस्ताव पाठवावा, असे निर्देशही मलिक यावेळी दिले.

हेही वाचा -कृषी सुधारणांवर शरद पवारांनी घेतला यू टर्न - नरेंद्र मोदी

पॉलिटेक्निक कॉलेजच्या जवळची जागा विचाराधीन -

जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण संस्था व पॉलिटेक्निक कॉलेज यांच्या मध्ये दोन्ही विभागाची जागा उपलब्ध आहे. या जागेवर सुमारे 200 विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभारण्याचे नियोजन आहे. ही जागा देण्यासाठी कौशल्य विकास विभागाची मंजुरी मिळावी, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली. तसेच प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेतून मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात वसतीगृह उभारण्यासंदर्भातही प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश मंत्री मलिक यांनी दिले. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या सचिव अंन्शु सिन्हा, कौशल्य विकास आयुक्त दीपक कुशवाह आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details